चाळीसगाव प्रतिनिधी । जमीनीच्या वाटणीवरून विवाहित महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत पोहोचवल्याची घटना तालुक्यातील वाघळी येथे घडली. ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाना मोतीलाल पवार (वय-४० रा. वाघळी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. नाना मोतीलाल पवार व भाऊ बाबू मोतीलाल पवार यांच्यात जमीनीच्या वाटणीवरून मंगळवार, १ जून रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास वाद झाली. दरम्यान सुनिता संजय बेडीस्कर (रा. तामसवाडी ता. पारोळा) या महिलेनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता बाबू मोतीलाल पवार यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. त्यावर नाना मोतीलाल पवार यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपकाळे हे करीत आहेत.