Home क्राईम चार वर्षाच्या चिमुकल्यासह महिला पिंप्राळा परिसरातून बेपत्ता

चार वर्षाच्या चिमुकल्यासह महिला पिंप्राळा परिसरातून बेपत्ता


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारी महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलाला सोबत घेवून बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. भारती लहू कोळी वय २७ आणि दिपक लहू कोळी वय ४ दोन्ही राहणार पिंप्राळा असे बेपत्ता झालेल्या मायलेकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा भागात भारती कोळी या विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता चार वर्षाचा मुलगा दिपक कोळी याला सोबत घेवून घरातून कुठेतरी निघून गेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सत्यवान वारंगे हे करीत आहे.


Protected Content

Play sound