महिला अन अल्पवयीन मुलाची चपलांचा हार घालून धिंड

mahila dhind

करनाल, वृत्तसंस्था | हरयाणातील करनालमध्ये आज (दि.२२) मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेला जमावाने बेदम मारहाण केली. तसेच चपलांचा हार घालून त्यांची संपूर्ण गावातून धिंडही काढली. दोघांना गावाबाहेर काढण्याचे फर्मानही पंचायतीने सोडले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. अल्पवयीन मुलाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. संबंधित महिला मूळची बिहारची रहिवासी आहे तर मुलगा बारावी इयत्तेत शिकणारा आहे. महिला आणि मुलाच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची धिंड काढण्यास गावातील सरपंचांचा विरोध होता, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. लोकांनी महिला आणि मुलाच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्यांची गावात धिंड काढली. आमच्या मुलाची हत्या करण्याचा ग्रामस्थांचा कट होता, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

Protected Content