मुंबई, वृत्तसंस्था | मुंबईतील मरिन लाईन्स जवळच्या समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.
मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. बुडालेले हे दोघे जण मुंबईतील कोणत्या भागातील रहिवासी आहेत, याबाबतची अद्याप माहिती समोर आलेली नाही. समुद्राला आलेल्या भरतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण येत आहेत. एक आठ वर्षांचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेला एक तरूणही उफाळलेल्या समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.