Home Cities यावल आ. अमोल जावळेंच्या पाठबळाने फैजपुरात युवा दिनी सर्वात युवा उपनगराध्यक्षा विराजमान !

आ. अमोल जावळेंच्या पाठबळाने फैजपुरात युवा दिनी सर्वात युवा उपनगराध्यक्षा विराजमान !


फैजपूर, ता. यावल- जितेंद्र कुलकर्णी | आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या पाठबळाने आज येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निकीता प्रकाश कोळी या अवघ्या एकवीस वर्षांच्या तरूणीची निवड करण्यात आली असून युवा दिनालाच एका युवतीची या पदावर झालेली निवड लक्षणीय मानली जात आहे.

आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली रावेर-यावल मतदारसंघात सर्व समाजांमधील तरूणाईला प्राधान्य देण्याचे धोरण सातत्याने अंमलात आणले जात असून याचे अतिशय सकारात्मक असे परिणाम दिसून आले आहेत. यात प्रामुख्याने अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत फैजपूर आणि रावेर येथे नगराध्यक्षपदासह भाजपला बहुमत देखील मिळाले. यावल येथे नगराध्यक्षपद मिळाले नसले तरी सर्वाधीक नगरसेवक भाजपचेच निवडून आले आहेत. यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीतही आ. जावळे यांनी सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य दिले आहे.

आज फैजपूर येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निकीता प्रकाश कोळी या अवघ्या एकवीस वर्षे वय असलेल्या तरूणीची निवड करण्यात आली. त्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत. या माध्यमातून आ. अमोल जावळे यांनी उच्चशिक्षीत आणि आदिवासी कोळी समाजातील तरूणीला उपनगराध्यक्षपद देऊन समाजाचा सन्मान केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आज राजमाता जिजाऊ जयंती असून युवा दिन देखील आहे. याच दिवशी आ. अमोल जावळे यांनी युवा नारीशक्तीचा सन्मान आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. विविध समाजघटकांना न्याय देण्याचे धोरण हे यातून नव्याने अधोरेखीत झाले आहे.


Protected Content

Play sound