चाळीसगाव प्रतिनिधी । बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे उघडकीला आले आहे. तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, निलेश अजबराव पाटील (वय-३३) रा. टाकळी प्र.चा. भडगाव रोड ता.चाळीसगाव या तरूणाने चाळीसगाव शहरातील एका खासगी बँकेत खाते आहे. १७ मे रोजी सकाळी ८.४० ते ८.४१ वाजेच्या दरम्यान बँकेच्या खात्याशील जोडलेल्या डेबीट कार्डचे बनावट नवीत कार्ड तयार करून निलेश पाटील यांच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहे.