सावदा, ता. रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या आरक्षणाचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करण्याचे आवाहन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते सावदा येथील प्रचार सभेत बोलत होते.
मुक्ताईनगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभियंता संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारासाठी सावदा येथे आज बाळासाहेब आंबेडकर यांची सभा पार पडली. यात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यात त्यांनी आरक्षण बचावची हाक दिली. सरकारला आरक्षण संपवायचे असल्याने नागरिकांनी अतिशय सुजाणपणे वंचितला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.