यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील प्रमुख गाव आणि शहरातुन जाणार्या राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचा रस्ता हा यावल शहरातुन जाणार की बाहेरून जाणार हा विषय सर्वत्र चर्चचा बनला असून , याबाबत राज्य महामार्गाचे अधिकारी कुठलीच माहिती देत नसल्याने नागरीकांमध्ये मार्गावरील रस्त्या विषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा राज्य महामार्ग हा गेल्या अनेक वर्षापासुन चौपदरीकरणाच्या प्रतिक्षेत होता. या मार्गावरील प्रस्तापित जमीन भूसंपादन हस्तांतरणाचे आदेश निघाल्यापासुन या भुसंपादीत होणार्या मार्गावरील शेती,विहिर, झाडे, ट्युबवेल आदी व्यवसायीकांचे बांधकाम यांच्यासह चौपदरीकरणाचे मार्ग निश्चितीकरण व विविध विषयांवर चर्चा रंगु लागल्या आहेत. सदरचा हा मार्ग यावल शहरातुन जाणार की बाहेरून ही चर्चा देखील होत आहे.
दरम्यान, यावलकरांच्या मते हा मार्ग शहरातुन गेल्यास शहरातील कला, विज्ञान व वाणीज्य महाविद्यालया पासुन तर बसस्थानक परिसर , शहरातील प्रमुख बुरूज चौक या ठिकाणासह संपुर्ण रस्त्याच्या कडेला लागुन असलेले अतिक्रमण हे शहरातील नागरीक व वाहन धारकांसाठी डोकेदुखी ठरणार्या अतिक्रमणातुन कायमची सुटका मिळेल. यामुळे शहराच्या सोंर्दयात भर पडुन शहराला एक वेगळी दिशा व दशा मिळेल अशी अपेक्षा नागरीकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबतची संभ्रमावस्था दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.