नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात माझ्यासोबत जे घडले, अन्याय झाला त्याविरुद्ध २३ मे रोजी संसदीय समितीसमोर सर्वासमक्ष साक्ष देत माझा हक्क बजावणार आहे. असे खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
खा. नवनीत राणा, आ.रवि राणा, यांच्यासह ३० सदस्य लडाख लेह सीमेवर दौऱ्यात आहेत. यात खा. नवनीत राणा, खा. प्रकाश जावडेकर आणि खा. संजय राऊत हे राज्यातील तीन खासदार सदस्य आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात राणा विरुद्ध शिवसेना असा शाब्दिक वाद रंगला. परंतु लेह लडाख मधील परराष्ट्र व्यवहार समितीचा दौर्यावर असताना यावेळी खा. संजय राऊत आ.रवि राणा आणि खा. रवि राणा यांचे फोटो सोशल मिडीयावर येत आहेत.
या संदर्भात खा. नवनीत राणा यांनी हा परराष्ट्र व्यवहार समितीचा अभ्यास दौरा आहे. या दौऱ्यात मी माझ्या राज्याची संस्कृती जपली. त्यात राज्यातले वाद येथे नकोत. भारतीय सीमेवर १७ हजार फुट उंचीवर राहून तैनात असलेले जवान सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांचे मी आभार मानते.
खेळीमेळीचे वातावरण असले तरी, हि माझ्या विचारांची लढाई आहे. एकदा जेलमध्ये जाऊन आले आहे. आणि जेलमध्ये टाकणारेही इथेच बसले आहेत. राज्यात माझ्यावर जो अन्याय झाला, त्यावर संसदीय समितीसमोर साक्ष देणार असून विचारांची लढाई विचारांनीच लढणार असल्याचेही खा. नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.