रावेर, शालीक महाजन Special Report । राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत असतांना भाजपसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. जळगाव महापालिका हातातून गेली असतांना मुक्ताईनगरातही पक्षाला गळती लागली असून अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. यामुळे पक्षातील आऊटगोइंग थांबविण्यासाठी फडणवीसांना जिल्हा भाजपमधील अंतर्गत प्रवाह समजून घेत ऑपरेशन करावे लागणार आहे. तर सध्या तरी याची जबाबदारी कुणी नेता घेत नसल्याने याबाबतही ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे.
याबाबत वृत्त असे की, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस खरच केळी बांगाच्या नुकसानीसाठी येताय की भाजपातुन सुरु असलेली आऊटगोईंग संदर्भात पक्षांतर्गत मोठे ऑपरेशन करतात याकडे आता रावेर व मुक्ताई नगर तालुक्याचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्यापासुन भाजपाला ग्रहण लागले आहे.जळगाव,भुसावळ,मुक्ताई नगर येथील नगर सेवकांनी भाजपाला रामराम करत सेना राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
कधी काळी भाजपचा अभेद्य भाजपाचा गड ढासळत असतांना जिल्हा भाजपातून याची उघडपणे कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. जिल्हात माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील अनुभवी नेते असतांना भाजपातील आऊटगोईंग थांबवायला कोणीही पुढे येतांना दिसत नसतांना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नुकसान दौरा हा पाहणीचा आहे की डॅमेज कंट्रोलचा ? याची मात्र चर्चा सुरु झाली आहे.
फडणवीस याकडे लक्ष देणार का ?
दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते.या परीसरात दर वर्षी केव्हा ओला दुष्काळ तर केव्हा वादळी पाऊस यामुळे येथेल शेतकर्यांचे बर्याच वेळा नुकसान झाले आहे.केळी संदर्भात पिक विमा..शिथिल करणे..केळीला फळा दर्जा मिळणे केळीवर प्रक्रिया उद्योग यावा अश्या मागण्या याभागातील शेतकर्यांची आहे.हे जटील प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून सोडवून घ्यावे अशी अपेक्षा शेतकर्यांच्या आहे.
जामनेर मुक्कामात काय शिजणार.. ?
दरम्यान माजी मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत असतांना भाजपातुन सुरु असलेले आऊटगोईंग आणि त्यात केळी बागांचे झालेले नुकसान या संदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौर्यावर येत आहे.आणि त्यात त्यांचा जामनेर येथे गिरीश महाजन यांच्याकडे मुक्काम करणार आहेत. त्यामुळे भाजपा होणारे नुकसान भरपाईची आज रात्री चर्चा होईल यात कोणतीही शंका नाही तर उद्या केळीचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात येणार आहे.
मेगा रिचार्ज प्रकल्प लालफितीत
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तात्कालीन मुख्यमंत्री असतांना मेगा रिचार्ज संदर्भात शेजारील बुरहानपुर येथे मेघा रिचार्ज प्रकल्पला गती दिली जाईल काम वेगाने केले जाईल असे जाहीरसभेत सांगितले होते.परंतु दोन्ही राज्याना जोडणारा मेगा प्रकल्प लालफितीत अडकला आहे.