स्थापनेसाठी सर्व काही करणार : नारायण राणे

narayan rane

 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून आपल्याला सत्तास्थापन करायची आहे. त्यामुळे त्यांनी मला कामाला लागा असे सांगितले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी जे-जे करावं लागेल ते-ते करणार.’ असे म्हणत नारायण राणेंनी फोडाफाडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या भाजपच्या ऑपरेशन लोट्सचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत.

 

सत्तास्थापनेसाठी जे-जे करावे लागेल ते-ते करणार. मला मुख्यमंत्र्यांनी बोलावून सांगितलय की, आपल्या सत्तास्थापन करायची आहे. त्यामुळे कामाला लागा.’ असे मोठे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. बुधवारी रात्री ‘वर्षा’वर येऊन राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यानंतर बाहेर येऊन त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. याचवेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.

Protected Content