धरणगाव : कल्पेश महाजन मागील काही दिवसांपासून न्यायालयीन प्रक्रियेत व्यस्थ होतो. परंतू आपण विधानसभा लढविणार, यात कुठलेही दुमत नाही. अगदी रविवार पासून मतदार संघात फिरायलाही सुरुवात करत असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणी शिक्षा झाल्यामुळे ते निवडणूक लढवू शकतील किंवा नाही? याबाबत कायदेशीररित्या संभ्रम होता. परंतू आता त्यांचे चिरंजीव विशाल देवकर हे स्वत:मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना विशाल देवकर यांनी सांगितले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे आप्पासाहेब निवडणूक लढऊ शकले नाहीत. तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे. अगदी आप्पासाहेबांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच माझी उमेदवारी असेल. रविवारपासून मतदार संघात प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती विशाल देवकर यांनी दिली. त्यामुळे आता जळगाव ग्रामीण मतदार संघात राज्यमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध विशाल देवकर अशी लढत रंगणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, शिवसेना,राष्ट्रवादीच्या या लढतीत भाजपची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.