विजेच्या धक्क्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

mitra

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या तीन वर्षांच्या बालक अंगणात खेळत असतांना विजेच्या खंब्याला धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेली माहिती अशी की, गुरू संतोष माळी (वय-3) रा. पिंप्राळा हुडको हा चिमुकला दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अंगणात खेळत असतांना विजेचा खंब्याला धक्का लागला. विजेचा धक्का लागल्याचे पाहताच गल्लीतील एकाने काठीने मारून बालकाला बाजूला केले. यावेळी बालकाची आजी बाहेर बसली होती तर वडील संतोष माळी हे वर गच्चीवर काम होते. दरम्यान मुलाला विजेचा धक्का लागताच बालकाच्या आईने कडेवर घेतले होते. त्यावेळी मुला मान टाकून दिली. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मृत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content