Home क्राईम पतीचा खून करून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पतीचा खून करून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न


crime
crime

जळगाव । जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात फरशी घालून जीवे ठार मारले. यानंतर गर्भवती पत्नीने फिनाईल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना रविवार पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील महिलेची प्रकृती चिंताजणक असून तीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मानसिक संतुलन खराब असल्याने पत्नीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत जामनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत पतीचे नाव संदीप उत्तम पवार (वय 20, रा. नेरी, ता. जामनेर) असे आहे. नेरी येथे उत्तम पवार यांची शेती आहे. तसेच दोघे मुले मृत संदीप व संतोष पत्नी जनाबाई सुना नातवंडे असा परीवार आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच संदीप व कोमलचे लग्न झाले होते. ती सात महिन्याची गर्भवती आहे. गेल्या काही दिवसापासून तिचे मानसिक संतुलन बिघडले. शुक्रवारी ती माहेरी मोहाडी येथे गेली होती. लगेच शनिवारी परत आली. आज सकाळी पाच वाजता उठून जो तो आपआपले काम करीत होते. कोमलनेही घराची झाडझूड केली. यानंतर ती बाहेर आली. या ठिकाणी एका घराचे काम सुरू आहे. येथून फरशी (पेव्हर ब्लॉक) घेतला. थेट पती झोपलेला होता त्या रूममध्ये जाऊन तिने पतीच्या डोक्‍यात फरशी घातली. यात पती संदीप गंभीर जखमी झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा रस्त्याच मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. डोक्‍यात तीन ते चार ठिकाणी जखमा दिसून आल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound