Home क्राईम भररस्त्यात कॉलेजला जाणाऱ्या पत्नीवर पतीकडून चाकू हल्ला

भररस्त्यात कॉलेजला जाणाऱ्या पत्नीवर पतीकडून चाकू हल्ला


सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सांगली जिल्हयात आज ७ ऑगस्ट रोजी कॉलेज कॉर्नरजवळ एका व्यक्तीने कॉलेजला जाणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून जवळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल काळे असे पीडित महिलेचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच प्रांजलचा संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, काही कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, दोघेही वेगळे राहत होते. दरम्यान, आज सकाळी प्रांजल कॉलेजला जात असताना संग्रामने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रांजलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पतीविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला कॉलेजला जात असताना आरोपीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपीने पत्नीवर हल्ला का केला, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound