मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला विरोध करून त्यांची पाठराखण करतांना एकनाथ खडसे यांच्या नार्को टेस्टची मागणी केल्याचा उल्लेख करत टोला मारला आहे.
पार्श्वभूमी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड 22 दिवसांपासून बेपत्ता होता, जो अलीकडेच पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे. अनेक नेत्यांना घेरले आहे.
गिरीश महाजन यांचा टोला
या अनुषंगाने आहे गिरीश महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला विरोध करताना शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “मी एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा, असे म्हणत होतो. तेव्हा शरद पवारांनी मागणी मान्य केली का? नार्को टेस्ट कशासाठी करायची? जर गरज असेल तरच अशी टेस्ट होत असते. मात्र माझी मागणी मान्य झाली नाही ” असे महाजन म्हणाले.
खडसे विरुद्ध महाजन संघर्ष
विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करी आणि अवैध उत्खननाचे गंभीर आरोप केले होते. त्यांनी खडसे यांच्या कुटुंबीयांना तीन वर्ष जेलमध्ये राहावे लागल्याचा आरोप केला होता. खडसे यांनीही महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यात वाळूतस्करी आणि अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला होता. आता महाजन यांनी पुन्हा खडसे यांना टोला मारला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “यात कोणालाही माफ केले जाणार नाही. चौकशी अतिशय कठोर पद्धतीने केली जाईल.”