कुट्टीने भरलेली मिनीडोअर मागे घेतांना चेंगरून मुलगा ठार

8035c198 2db5 4b11 9a40 3915851e3ad5

जामनेर(प्रतिनिधी) कडबा कुट्टीने भरलेली मिनीडोअर (छोटा हत्ती) रिव्हर्स घेत असताना गाडीच्या मागील चाकाखाली येवून सोनारी तांडा येथील सात वर्षे वयाचा मुलगा ठार झाल्याची घटना आज दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास घडली.

 

तालुक्यातीलच कुंभारी येथून मिनीडोअर (क्रमांक एम.एच.४६/ ई-०६१३) कडब्याची कुट्टी घेवुन आली होती. या गाडीतील कुट्टी खाली करण्यासाठी चालक गाडी रिव्हर्स घेत असताना तिथेच खेळत असलेला गुरूदास रतनसिंग राठोड (वय-७) याचा मागच्या चाकाखाली येवू म्रुत्यु झाला. दरम्यान घटना घडल्यानंतर मुलाच्या पालक नातेवाईक यांनी शहरातील काही दवाखान्यात गुरूदासला उपचारासाठी नेवून धावपळ केली पण काही उपयोग झाला नाही. मयत गुरूदास हा तीन बहिणीचा एकुलता एक भाऊ होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. रतनसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला वाहन चालकाविरूध् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content