चाळीसगाव प्रतिनिधी । बसमध्ये चढताना विद्यार्थ्याचा खिश्यातून ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, महेश्वर सुखदेव घुले (वय-२३) रा. वडी रामसगाव ता. घनसांगवी जि.जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने २५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहरात आला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिश्यातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. बसमध्ये बसल्यानंतर महेश्वर घुले यांना हा प्रकार लक्षात आला. घुले यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.