चाळीसगाव प्रतिनिधी । सामाजिक क्षेत्रातील प्रश्न आणि उपक्रम राबवून अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले येथील ‘रहा अपडेट व्हाट्सअप गृप’ सदस्यांचा गेट टुगेदर स्नेह मेळावा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचा सत्काराचा कार्यक्रम आज (दि.२) दुपारी मिलींद नगर येथे समता सैनिक दलाचे राज्य पदाधिकारी नानासाहेब बागुल यांच्या राजगृह निवासस्थानी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दलाचे राज्य पदाधिकारी नानासाहेब धर्मभुषण बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर होते तर प्रमुख उपस्थिती उद्योगपती नारायण अग्रवाल, डॉ.सुनिल राजपुत, आयोजक धर्मभुषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष तथा गृप ॲडमीन दिलीप घोरपडे, मुराद पटेल, उद्योजक वर्धमान धाडीवाल, पवार गुरुजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम, जिल्हा पदाधिकारी के.डी. पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, उदय पवार, देवेंद्र पाटील, अजय जोशी, राहुल राजपुत, राहुल पाटील, सचिन फुलवारी, पत्रकार सुर्यकांत कदम, अर्जुन परदेशी, आरीफ खाटीक, रविंद्र सुर्यवंशी, सर्पमित्र मयुर कदम, स्वप्निल कोतकर, अमित दायमा, समकीत छाजेड, राकेश नेवे, गौतम जाधव, विवेक चौधरी, ॲड रणजीत पाटील, सोनवणे, न.पा.चे तुषार नकवाल, शुभम चव्हाण, नितीन साळुंखे, बंटी राजपुत, विनु सराफ, सचिन स्वार, भैय्या पाटील, श्रीकांत राजपुत, उदय वाघ, योगेश शेळके, सलीम सैय्यद, योगेश बलदार, विरेंद्र राजपुत यांच्यासह ‘रहा अपडेट व्हाट्सअप गृप’चे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उद्योजक नारायण अग्रवाल यांचा सत्कार अपर्णा बागुल, धर्मभुषण बागुल, अवधेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आला तर वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवा म्हणून डॉ. सुनिल राजपुत, गडकिल्ले संवर्धन मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच गृप ॲडमीन दिलीप घोरपडे, गृप ॲडमीन मुराद पटेल, वृक्षारोपण साठी पुढाकार घेणारे वर्धमान धाडीवाल, अजय जोशी, उदय पवार, सर्प व प्राणीमित्र मयुर कदम यांचा सत्कार नारायण अग्रवाल, किसनराव जोर्वेकर, आर.डी.चौधरी, पवार गुरुजी रामचंद्र जाधव, रोशन जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक धर्मभुषण बागुल व अपर्णा धर्मभुषण बागुल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अधिक परीश्रम स्वप्निल जाधव, दिलीप चव्हाण, अजय सोनवणे, विकी बागुल, विष्णु जाधव, दिपक बागुल यांनी घेतले. चहा, नाश्ताच्या कार्यक्रम झाल्यानंतर मेळाव्याचा समारोप करण्यात आला.