कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय?; सामान्यांचा शहा, पंकजाताईला सवाल

pankaja munde amit shah

 

बीड (वृत्तसंस्था) सावरगावमधील मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम ३७० च्या मुद्द्यांवर भर दिला. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून महाराष्ट्रातील निवडणुकीचा काश्मीर आणि कलम ३७० शी काय संबंध? असा सवाल ट्विटवर उपस्थित केला आहे.

 

अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये, ‘पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिल्यानंतर पाच महिन्यांमध्ये सरकारने कलम ३७० रद्द केले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही. कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का?’ असा सवाल उपस्थितांना आपल्या भाषणामधून केला. तर दुसरीकडे पंकजा यांनाही आपल्या भाषणातून राष्ट्रभक्ती या विषयावर जोर दिल्याचे पहायला मिळाले. दरम्यान या सभेसाठी आलेल्या शाह यांचे स्वागत ३७० तोफांची सलामी देत ३७० राष्ट्रध्वज फडकवत करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजपाचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content