मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचे काय झाले? अमित ठाकरेंचे चंद्रकांत पाटलांना पत्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासंबंधीची घोषणा केली होती. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सोमवारी या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांना एक पत्र लिहून सिईटीचा निकाल लागला, आता तरी जीआर काढा, अशी जाहीर विनंती केली आहे.

16 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता एमएचटी-सिएटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा स्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणी अमित ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

Protected Content