सोलापूर (वृत्तसंस्था) सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केले?, असा सवाल बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा नातूच घटनेचा खून करण्यास निघाला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलेय. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उतरत प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंना आव्हान दिले आहे.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत,’ अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसनेच घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुशीलकुमार शिंदेंची स्मरणशक्ती फार कमी असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. काल शिंदेंनी आंबेडकरांवर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता.