Home राजकीय मागील आश्वासनांचे काय? दुकानदाराच्या प्रश्नावर अनुपम खेर यांची फजिती

मागील आश्वासनांचे काय? दुकानदाराच्या प्रश्नावर अनुपम खेर यांची फजिती

Anupam Kher
Anupam Kher

Anupam Kher
 

चंदीगड (वृत्तसंस्था) चंदीगडमध्ये प्रचारादरम्यान एका दुकानदाराने भाजपचा 2014 चा जाहीरनामा दाखवत अनुपम खेर यांना मागील आश्वासनांबद्दल विचारल्यानंतर त्यांची चांगलीच फजिती उडाली. पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली. दरम्यान, अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करुन हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

 

 

किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांचा प्रचार करत आहेत. चंदीगडमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांसह अनुपम खेर एका दुकानात पोहोचले. त्यावेळी दुकानदाराच्या हातात भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा होता. जाहीरनामा दाखवत त्याने विचारले की, मागील निवडणुकीत तुम्ही काही आश्वासने दिली होती, यापैकी तुम्ही काय केले आहे? मात्र, यावेळी अनुपम खेर यांना कोणतेही उत्तर देता आले नाही आणि ते तिथून हात जोडून निघून गेले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound