यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील विविध पाझर तलावातील व मोर धरणाचा जिवंत जलसाठा संपल्याने पाणीप्रश्न युद्धपातळीवर सोडविण्यासाठी प्रशासनाने पाच गावातील विहीर /टुबवेल अधिग्रहीत केल्याने पाणीटंचाईने त्रस्त गावांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील गेल्या काही दिवसा पासुन पाण्याचा स्रोत देणारी पाझर तलाव व परिसरातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारे मोर धरणाचा जलसाठा संपल्याने पाण्याचा पश्न गंभीर बनला होता , या जलसंकटाची समस्या सोडविण्यासाठी यावल तालुक्यातील डोंगरदेपाडा, वनोली, नायगाव , शिरसाड, कोळवद या गावाच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व पंचायत समितीचे टंचाई निवारण कक्षाचे आर.पी. देशमुख आणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभीयंता एस.ए.सुरवाडे यांनी यावल महसुल प्रशासनाच्या माध्यातुन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे वनोली येथील उषाबाई शिवाजी चौधरी, डोंगरदेपाडा येथील प्रकाश पुरुषोत्तम राणे, नायगावचे सुधाकर यादव जवरे, शिरसाडच्या प्रमिला प्रभाकर महाजन आणी कोळवद येथील यशोधर कौतीक पाटील यांच्या नावांची शिफारसीला मान्यता मिळाल्याने त्यांचा विहीर/टुयुबवेल आधिग्रहीत करण्यात आल्या असल्याने आज रोजी भासत असलेल्या पाणीटंचाईला तात्पुरता दिलासा मिळाला असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आहे ,या सर्व विहीर/ टुबवेल साठी लागणारे खर्च नैसर्गीक आपत्ती निवारण अर्थ सहाय्य च्या माध्यमातुन करण्यात येणार आहे.