जळगाव प्रतिनिधी । स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या पदाधिकारी दिल्लीला जात असतांना आज जळगाव रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष दिनेश गुप्ता, राष्ट्रीय सलाहकार रविसेठ गुप्ताजी, ठाणे जिल्हा कार्यअध्यक्ष आनंद पांडेजी, ठाणे जिल्हा कार्यकारणी महेंद्र कुमार पांडे यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनिल नंन्नवरे, युवक जिल्हा अध्यक्ष धनराज साळुंके, युवक जिल्हा उपध्यक्ष राहूल निकुंभ, गणेश कोळी, किरण भावसार, राजू पाटील, राजेंद्र चौधरी, मिलींद निकुंभ यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.