भुसावळ प्रतिनिधी । नागरिकत्व संशोधन कायद्याचे अखिल भारतिय राष्ट्रभक्त मंचच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व विद्यार्थी, महिला-पुरुष, समाज आणि व्यापारी संघटनाकडून स्वागत व समर्थन करण्यात येत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान, अफगनिस्तान आणि बांगलादेश येथील धार्मिक अत्याचार पिडीत निर्वामित हिंदू, बौध्द, जैन, शीख, पारमी व इसाई बांधवांना नागरिकत्व देण्यासंदर्भात भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक असे नागरिकता संशोधन विधेयक (CAB) बहुमताने पारित झाले आहे. राष्ट्रपति यांनी या विधेयकाचा आपली स्वाक्षरी होऊन रूपांतर नागरिकता संशोधन कायद्यात झालेले आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याचे (CAA) भुसावळ तालुक्यातील सर्व विद्यार्थी, महिला, पुग्य, सर्व समाज आणि व्यापारी संघटना स्वागत व समर्थन करतो. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कायद्याचे स्वागत केले जात असतांना काही लोक स्वतःला थोर विचारवादी समजणारे या कायद्याचे विरोधात जाऊन देशात अराजकता माजवण्याचे काम व काही संघटना करत आहेत. अर्थवट व चुकिची माहिती सरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करविण्यात येत आहे. हिंसाचार पसरवणा-या व्यत्की व संघटनांवर योग्य ती चौकशी करून गुन्हे नोंद करावेत व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) समर्थन अभिनंदन सभा करत आहे.
यावेळी खा.रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी, सर्व सामजातील लोक, व्यापा-यातील मंडळी उपस्थिती होते.