यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | किनगाव येथून पांडुरंगाच्या वारीला दर्शनासाठी पंढरपूर गेलेल्या भाविकांचे येथील श्रीराम मंदीर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.
किनगाव तालुका यावल येथे पंढरपुरला पांढुरंगाच्या दर्शनास किनगाव ते पंढरपुर च्या वारीला ६०० किलो मिटर लांब अशी पदयात्रा करणाऱ्या वारकरी म्हणुन आलेले भाविक किनगाव येथील शिवाजी गुलाब पाटील, इंदुबाई सुधाकर वंजारी व भावलाल विष्णू महाजन या वारकरी भाविकांचे वारीहुन पंढरपूर येथून परत आल्यानंतर श्रीराम मंदिर संस्थान तर्फे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी किनगाव येथील प्रगतशील शेतकरी भिकन शामराव पाटील यांनी श्रीराम मंदिरास मृदुंग सप्रेम भेट दिला. यावेळी श्रीराम मंदिर संस्थांचे अध्यक्ष करमचंद गेंदा पाटील, भिकन शामराव पाटील, ह.भ.प. लिलाधर महाराज, संभाजी तुळशीराम वराडे, गुलाब हनुमंत पाटील, महेंद्र महाजन, छगन धर्मा पाटील, तुळशीराम महाजन, वसंत महाजन, राजू महाजन व चांगदेव ठाकूर यांच्यासह भाविक व इतर ग्रामस्थ मोठया संख्येनं उपस्थित होते.