ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

जामनेर प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक, मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे आज दि.४ सोमवार रोजी शासन आदेशानुसार इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचे सॅनिटायझर व मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून थर्मामीटरने तापमान तपासणी करून विद्यार्थी पालकांचे हमीपत्र आणि संमतीपत्र जमा करून विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे संचालक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी सोनार यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकआणि वह्या वाटप करण्यात आले.तसेच शाळा भेटीसाठी आलेल्या पंचायत समिती जामनेर येथील विषय तज्ञ शिक्षिका मंगला जवळेकर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गजन्य रोगापासून आपण आपले संरक्षण कसे करावे. याविषयी मार्गदर्शन केले. व पुस्तक वाटप केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे सर यांनी प्रास्ताविकातून शिक्षणोत्सव या संदर्भात माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात शिवाजी  सोनार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन .व्ही.एन.पाटील यांनी केले. तर आभार उपशिक्षिका.एम.आर.भारंबे यांनी व्यक्त केले.त्यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते. यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content