जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास शासकीय विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, यांनी स्वागत केले.