ममुराबाद ग्रामस्थांकडून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जल्लोषात स्वागत


0b987b0a 1fa2 4b61 a31d 544ac74481bb
 

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज सकाळी ममुराबाद ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गावात भव्य प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी श्री.चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या सौ.माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातिल प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख किरण पाटील, बूथ प्रमुख राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.