पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे आज सकाळी ११ वाजता पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार सोहळा शिवालय कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
जसं शिक्षण प्रणाली हि वेळ व काळानुसार कामकाज पध्दतीत बदल होऊन आॕनलाईन प्रणालीत वर्गीकरण झाले तशी पत्रकारिता क्षेत्र हे आता आॕनलाईन झाल्याने – आता घराघरात मोबाईल पोहचल्याने सर्व घडामोडी माहिती बातम्या ह्या सोशल मिडीयाद्वारे अर्थातच व्हाट्सअप, फेसबुक द्वारे माहिती वेगात प्रसारीत होत असल्याने आॕनलाईन कामकाज करणारे पत्रकारांना त्यांचे प्रश्न, सन्मान, हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय मान्यता प्राप्त वेब मिडीया असोसिएशन मुंबई संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वर चोरडिया यांनी जाहिर केलेल्या पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सोहळा शिवालय कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शिवसेना मा. जिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारवकर व जि.प. सदस्य रावसाहेब पाटील आणि प्रविण ब्राम्हणे, रमेश बाफना, राजु पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार किशोर पाटील यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणाली’चे आणि नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा दिल्यात. आणि वेब मिडिया असोसिएशन च्या सर्व पत्रकारांसाठी लागणारी सर्वोत्परी मदत करण्याचे वचन यावेळी सर्वांसमक्ष दिलेत. संपादक आतीक चांगरे यांचे “तिसरा डोळा न्युज २४” या नवीन पोर्टल’चे शुभारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल, (गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव), जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया (जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक), जिल्हा उपाध्यक्ष – सचिन पाटील (फोकस न्युज संपादक), जिल्हा सचिव- नंदु शेलकर (लोक लाईव्ह व लाईव्ह ट्रेंड न्युज), जिल्हा संघटक- एन. एस. भुरे (आरोग्य दुत न्युज संपादक), जिल्हा समन्वयक – जावेद शेख (स्टार १८ न्युज), जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने (फोकस न्युज कार्यकारी संपादक), जेष्ठ सदस्य – योगेश पाटील (झेप इंडिया’चे संपादक), जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे (देशदुत, आरोग्य दुत), जेष्ठ सदस्य – राजु धनराळे (आर. के. न्युज), तालुका अध्यक्ष- निलेश पाटील (एम. एन. न्युज), तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार (तालुका माझा), तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी (सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी), तालुका सचिव- संजय पाटील (झेप इंडिया’चे प्रतिनिधी), तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी (झुम मराठी न्युज संपादक), तालुका समन्वयक- प्रमोद बारी (जनलक्ष न्युज संपादक), दिलीप पाटील (ट्रेन लाइव्ह न्युज संपादक), सदस्य – फकिरचंद पाटील (इंडिया आपतक न्युज), सदस्य – राहुल महाजन (गर्जा महाराष्ट्र सहसंपादक), सदस्य – भिकन पाटील शिंदाड (स्टार १८ न्युज), सदस्य – सचिन चौधरी (फोकस न्युज संपादक), जिल्हा सचिव- दिनेशचौधरी, जिल्हा खजिनदार – दिपक पाटील , निसर्ग राजा न्युज संपादक आतिक चांगरे व संदिप तांबे , स्वप्निल कुमावत, राजु शिंपी, विजय पाटील, यशवंत पवार, ज्ञानेश्वर राजपुत, सोनु परदेशी, सुनिल सोनार, राजु निकम संपादक आर.डी. आर. न्युज दिपक मुलमुले, राजु ठाकुर यांना पाचोरा शिवसेना व युवासेना तर्फे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाना वाघ तर प्रास्ताविक यशवंत पवार यांनी केले.