मुंबई प्रतिनिधी । अजितदादा यांच्या सहकार्याने राज्याला मजबूत सरकार देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
आज सकाळी शपथविधी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यालयास भेट दिली असता त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल. अजित पवार यांच्या पाठींब्याने आपण राज्याला मजबूत सरकार देणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी पक्षाचे नेते आणि पदाधिकार्यांनी जोरदार घोषणा बाजी केली.