Home राजकीय विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही :...

विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही : मुख्यमंत्री

mumbai cm devendra fadanvis bjp
mumbai cm devendra fadanvis bjp

 

mumbai cm devendra fadanvis bjp
 

पाथर्डी (वृत्तसंस्था) विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असे सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.


Protected Content

Play sound