कोहिमा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहुल गांधी म्हणाले- 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोदी-आरएसएसचा कार्यक्रम आहे. आरएसएस आणि भाजपने 22 तारखेला निवडणुकीचा तडका दिला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी या कारणास्तव तेथे जाण्यास नकार दिला आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. ज्याला काँग्रेस सोडायची असेल तो सोडू शकतो. भारत जोडो न्याय यात्रेच्या तिसऱ्या दिवशी (16 जानेवारी) राहुल यांनी ही प्रतिक्रिया दिली. कोहिमा (नागालँड) येथील विश्वेमा गावातून राहुल गांधींनी यात्रेला सुरुवात केली.
I.N.D.I.A. मधील जागावाटपाबाबत राहुल म्हणाले की, आघाडी निवडणूक लढवेल आणि जिंकेल. जागा वाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. बर्याच ठिकाणी सोपे आहे, काही ठिकाणी थोडे अवघड आहे, पण आम्ही जागा वाटपाचा प्रश्न सहज सोडवू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडियाचे संयोजक बनवल्याबद्दल ममता बॅनर्जींच्या नाराजीवर राहुल म्हणाले – या छोट्या समस्या आहेत, त्या सोडवल्या जातील. आपल्या सर्वांमध्ये समन्वय आहे.