मुंबई (वृत्तसंस्था) ‘पवार साहेब म्हणजे अजित दादा आणि अजित दादा म्हणजे पवार साहेब, अशी आमची धारणा आहे. परंतू देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर आम्हाला सर्व लक्षात आले. परंतु आम्ही शरद पवारसाहेबांचे पाईक आहोत. त्यामुळे बंडखोरी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पाटील यांना हरियाणात नेण्यात आले होते.
यावेळी अनिल पाटील पत्रकारांशी बोलतांना म्हटले की, अजित पवार यांनी व्हीप बजावला तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचाच आदेश पाळणार, मग आमदारकी गेली काय आणि राहिली काय, तरी आम्ही साहेबांसोबतच राहणार. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने, जे राष्ट्रवादीच्या विधीमंडळाचे गटनेते आहेत, त्या अजितदादांनी आम्हाला सात वाजता बोलावले. आम्ही आदेशाचे पालन करत गेलो. याला बंडखोरी कशी म्हणायची? ‘पवार साहेब म्हणजे अजित दादा आणि अजित दादा म्हणजे पवार साहेब, अशी आमची धारणा आहे. परंतू देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर आम्हाला सर्व लक्षात आले. आम्ही शरद पवारसाहेबांचे पाईक आहोत. त्यामुळे बंडखोरी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.