पाचोरा (प्रतिनिधी) येथील नगर पालिकेचे आरोग्य सभापती सतीश चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि.१७) प्रभागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सार्वजनिक पाण्याच्या टाकीचे लोकार्पण कण्यात आले. तसेच शाळेत विध्यार्थांना वहया व इतर शालेय साहित्याचे वाटप नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक व आरोग्य सभापती सतिश चेडे म्हणाले की, मी राजकारणापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातुन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण समाजासाठी काय केले, हे पाहणे महत्वाचे आहे. आज सतीश चेडे यांच्या वाढदिवसानिमीत तीन-चार ठिकाणी फळे व शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. नागरिकांच्या अडचणीचा लवकर निपटारा करण्यासाठी नगरपालिकेत आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी आढाव यांच्या सहकार्याने यश मिळेपर्यंत प्रयत्न करणार असल्याचेही चढे यांनी यावेळी सांगीतले. या कर्यक्रमात आरोग्य अधिकारी धनराज पाटील, विलास देवकर, नगरसेवक वाल्मिक पाटील, बापू हटकर, डॉ. बापू बेंडाळे, महेश पाटील,पप्पू राजपूत, नाना वाघ, जितू पेंढारकर, वैभव राजपूत, गणेश चोधरी, सौरभ चेडे, गुलाब पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.