जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीत पाण्याची टंचाई मे महिन्याच्या सुरवातीलाच जाणवू लागली आहे. पाणी पाणी टंचाई संदर्भात शहरात उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्याचे पत्र महापौर सीमा भोळे यांनी नागरसचिवांना दिले आहे.
शहरातील नागरीकांना पाणी टंचाईमध्ये पुरेसे पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातुन पाणी टंचाई संदर्भात उपाययोजना करणेसाठी विशेष महासभेचे आयोजन करुन त्यामध्ये फक्त पाणी टंचाई संदर्भात चर्चा विनिमय करुन निर्णय घेणेसाठी विशेष महासभेचे आयोजन त्वरीत करणेत यावे अशी सूचना महापौर भोळे यांनी केली आहे.