श्रमदानातून घडणार जलक्रांती ; चाळीसगावात श्रमजीवींचा सूर

f536045a c448 4708 a1ff 7e677ae189d1

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात नूकतीच पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सुमारे ७० गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवित श्रमदानातून जलसमृद्धीची चळवळ उभारण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. यात आबालवृद्धांपासून सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवित जलसमृद्धीसाठी पुढाकार घेत श्रमदान केले हे औचित्य साधून ‘जलसंधारणासोबत मनसंधारण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

 

चर्चेदरम्यान श्रमजीवींनी आपल्या भावना व्यक्त करीत भविष्यकालीन तरतुदीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी आयकर आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, देवरे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्वला देवरे, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, आयबीएन लोकमतचे प्रफुल्ल साळुंखे, नगरसेविका सविता राजपूत, शेखर निंबाळकर, स्वप्नील कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जलसंधारणातून मनसंधारणाकडे, ध्यास जलक्रांतीचा या विषयावर रांजणगाव विकास मंच, निंबाळकर फाउंडेशन, जलसाक्षर अभियानाचे स्वप्नील कोतकर यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील केमिस्ट भवनात सुमारे पाच तास चाललेल्या चर्चासत्रात अनेक श्रमजीवींनी श्रमदानात उद्भवलेल्या अडीअडचणी व समस्यांवर मात करीत श्रमदान यशस्वी केल्याचे सांगितले.

यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या प्रीती रघुवंशी, वैशाली काकडे, अनिता शर्मा, प्रा.तुषार निकम, सचिन राणे, अमोल वाघ, शालीग्राम निकम, शांताराम पाटील आदी उपस्थित होते तर सोनाली निंबाळकर, सोमनाथ माळी, प्रदीप सोनवणे, योगेश साळुंखे, आर.डी.पाटील, आस्था माळदकर, प्रमोद चव्हाण, कोमल पाटील, आकांक्षा निकम, निखिल कच्छवा, गोकुळ पाटील, कैलास पाटील, रामचंद्र सोनवणे, अनिल गायकवाड, राहुल राठोड, प्रल्हाद सोनवणे, पंकज पाटील आदी श्रमजीवींनी भावना व्यक्त केल्या.

Add Comment

Protected Content