Home धर्म-समाज गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिपनगरात पाणपोई सुरू; प्रवाशांसाठी मोफत जलसेवेचा उपक्रम

गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिपनगरात पाणपोई सुरू; प्रवाशांसाठी मोफत जलसेवेचा उपक्रम


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी दिपनगर येथे सामाजिक बांधिलकी जपत पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि नागरिकांची तहान भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

सद्गुरु श्री ग. के. कस्तुरे यांच्या प्रेरणेने केशव कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक शाखा फेकरी यांच्या वतीने गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दिपनगर येथील २१० मेगावॅट फेकरी गेट परिसरात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री झेंडूजी महाराज संस्थान, बेळीचे मुख्य ह.भ.प. भरत महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.

उन्हाळ्याच्या दिवसांत भुसावळ-वरणगाव मार्गावरून दररोज हजारो नागरिक व प्रवासी प्रवास करतात. कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पाणपोई उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून सामाजिक कार्याचा एक आदर्शही समोर आला आहे.

या उपक्रमासाठी राधे राधे सोशल ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. केशव कृपा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मागील २१ वर्षांपासून सातत्याने मोफत जलसेवा उपक्रम राबवत असून, समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.

पाणपोई उभारणी आणि व्यवस्थापनासाठी संस्थेचे वैजनाथ कुलकर्णी महाराज, पवन महाराज, मोहन बोरोले, किशोर पाटील, किरण सपकाळे, रवींद्र सोनवणे, गणेश भारंबे, सुनील भिरूड, विजया पाटील, सुवर्णा सपकाळे, प्रतिभा जाधव, गुणवंती सपकाळे, भावना पाटील आणि लीना सपकाळे यांचे विशेष योगदान लाभले आहे.


Protected Content

Play sound