अमळनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील निम गावाने सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन अतिशय जोमाने कामास सुरुवात केली असल्याने या कार्यास प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी आर्थिक मदत करत देऊन श्रमदान देखील केले.
जयश्री पाटील या कळमसरे जळोद जि. प. गटाच्या सदस्या असून निम गाव याच गटात असल्याने त्यांनी ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी गावात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उमाकांत साळुंखे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, मुरलीधर पाटील तर निम येथील रणछोड पाटील, छोटू पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,हिलाल कोळी, ऍड संभाजी पाटील व सरकारी वकील ऍड राजेंद्र चौधरी उपस्थित होते. यावेळी जयश्री पाटील यांनी गावात केलेल्या संपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली व पाणी फाऊंडेशनच्या टार्गेटनुसार तंत्रशुद्ध काम पाहून संपूर्ण टीमचे कौतुक केले, तसेच शासनाने या गावास प्रोत्साहनपर एक लाखाचे बक्षीस दिल्याने त्याबद्दल देखील त्यांनी कौतुक केले. तर राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन गावाच्या हितासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांसह श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. त्यांनी दहा हजार रूपयांची मदत दिल्याने ग्रामस्थानी त्यांचे आभार व्यक्त केले.