मुंबई (वृत्तसंस्था) भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कुख्यात गुंड करीम लाला याला भेटत होत्या असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. त्यावर काँग्रेस अंडरवर्ल्डच्या भरवश्यावर निवडणुका जिंकत होते का? दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालत होते का?, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रसेला काही प्रश्न केले आहेत. काँग्रेसने राऊतांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे, काँग्रेस अंडरवर्ल्डच्या भरवश्यावर निवडणुका जिंकत होते का? दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालत होते का? तसेच इंदिरा गांधी खरंच करीम लालाला भेटत होत्या का? याचे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तर काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतकी लाचार झाला की, त्यांच्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर कोणीही बोलायला तयार नाहीत, असेही फडणवीस म्हटले आहेत.