कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खडके येथील प्रगतीशील शेतकरी व कासोदा येथील फ्रुटसेल सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन वामनराव जुलाल पाटील (वय ७०) यांचे अल्पश: आजाराने काल (दि. २०) रात्री ९.०० वाजता निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते जयसिंग पाटील यांचे वडिल होते. त्यांच्यावर आज (दि.२१) सकाळी खडके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.