पाकमध्ये बाँब फुटायची वाट बघतोय : मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

मुंबई प्रतिनिधी । आपण दिवाळीनंतर बाँब फोडणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांनी यावर आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

आज सकाळी नवाब मलीक यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सौभाग्यवतीवर सनसनाटी आरोप केल्याने खळबळ उडाली. याला फडणवीस यांनी उत्तर दिले. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकार्‍यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्यानं आणलेला माणूस आहे, असं रिव्हर मार्चने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

यावर प्रतिक्रिया देत मी पाकिस्तानमध्ये बाँब फुटायची वाट बघतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री वर्षा या निवासस्थानी पत्रकारांबरोबरच्या परिसंवादामध्ये बोलत होते. दरम्यान, मंत्रालय हे कार्यालय आहे नक्कीच जायला पाहिजे, पण गेलो नाही म्हणून कामं झालं नाहीत असं झालं आहे का? मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, इथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे काय केलं ते मला निस्तरायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Protected Content