व्यसनमुक्त व्हा; डॉ.विनोद कोतकर

उनाज

चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मासिक कार्यक्रमाअंतर्गत व्यसनमुक्ती चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांचे हस्ते झाले आहे.

यावेळी कोतकर म्हणाले की, प्रत्येक तरुणाने आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आयुष्यात आलेल्या संकटाच्यावेळी व्यसनांना जवळ न करता त्यापेक्षा अधिक कष्ट करण्याचा निश्चय केला पाहिजे. जेणेकरुन नैराश्यामुळे वाढणारी व्यसनाधिनता आटोक्यात आणता येईल. जो व्यसनमुक्त असतो तोच खरा देशभक्त बनून देशाची, समाजाची व कुटूंबाची सेवा करु शकतो. असे कोतकरांनी तरुण-पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम प्रसंगी केंद्रचालक भाऊ पाटील, डॉ रविंद्र मोरे, सोमनाथ सराफ, आशा शिरसाठ, विजय सपकाळे, रमेश पोतदार, वसंत वाणी, रविंद्र विसपुते, सुरेश गायकवाड, शालीक पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content