ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती करा – तहसीलदार देवगुणे

Raver Tahasildar

रावेर (प्रतिनिधी)। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जनतेला व्हीव्हीपॅट व ईव्हीएम, मशीनचे महत्व पटवून देवून त्यांच्या विस्वास संपादन करण्यासाठी तसेच येणाऱ्या निवडणुकीत नागरीकांकडून भरभरून मतदान व्हावे, म्हणून याची जास्तीत-जास्त लोकांपर्यंत मतदानाचा हक्क पोहचविण्याचे अवाहन नवनिर्वार्चीत तहसीलदार उषारानी देवगुणे यांनी केले.

कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन
तहसीलच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी श्रीमती देवगुणे बोलत होत्या. ही ट्रेनिंग 26, 27 फेब्रुवारी रोजी तीन शिप्टमध्ये होणार आहे. यावेळी नायब तहसीलदार कविता देशमुख, संजय तायडे आदी उपस्थित होते. यावेळी विठोबा पाटील यांनी उपस्थित कर्मचार्‍यांना निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी यांचे गाईडलाइन्स समजवून सांगितले. याकामासाठी 500 कर्मचारी प्रशिक्षित झाले असुन उद्या देखील ही प्रशिक्षण होणार आहे. यावेळी मोठ्या संखने शिक्षक,केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content