चाळीसगाव प्रतिनिधी । बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम आवारात वनमहोत्सवांतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी, संस्थेचे चेअरमन नारायणदास अग्रवाल म्हणाले की, वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे हि काळाची गरज बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन वृक्ष लागवड केली पाहिजे, सध्या वाढत्या तापमानमुळे पर्यावरण समतोल बिघडतोय. हे समजून घेतले पाहिजे. त्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे निसर्ग संतुलन बिघडले आहे. त्यासाठी पर्यावरणांच्या -हास टाळलाच पाहिजे. पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजेत. यातून दुष्काळावर मात करता येईल. म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व युनिट मध्ये १००० झाडे लावणार आहोत.
त्याचबरोबर उपस्थितांनी मते व्यक्त केली, प्रा. बिल्दीकर म्हणाले की, सर्व व्यवस्थापन मंडळाच्या संकल्पानुसार १००० झाडे लावणार असून, आवारात एकूण ५०० झाडे लावणार आहेत. प्रांत म्हणाले की, महाविद्यालयाचे हे मैदान म्हणजे चाळीसगावचे वैभव आहे. या वैभवात अजून भर पडावी म्हणून आम्ही वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनात वाढते, हरित क्षेत्र मोलाची भूमिका बजावते. हेच लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी वनराईशिवाय पर्याय नसल्यामुळे या परिसरात ५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.वन क्षेत्रपाल धनंजय पवार म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार तालुक्यामध्ये एकूण ६.५० लाख झाडे लावणार असून, ज्या संस्था झाडे जगवतील, त्यांनाच आम्ही झाडे देत आहोत. या संस्थेला आम्ही १००० झाडे देणार आहोत. तसेच वृक्ष लागवडी संदर्भात माहिती सांगितली. तसेच वृक्ष लागवडीसाठी लागणारे गांडुळखत नगरपालिकेचे चीफ ऑफिसर अनिकेत मानोरकर यांनी उपलब्ध करुन दिले आहे.
यावेळी चाळीसगाव एज्यूकेशन सोसायटीचे मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, उपविभागीय अधिकारी शरद पवार, पोलीस उपविभागीय आधिकारी उत्तम कडलग, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सर्पमित्र राजेश ठोंबरे, पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड, वनक्षेत्रपाल धनंजय पवार, डॉ. एम.बी.पाटील, श्यामलाल कुमावत, प्रदीप अहिरराव, जे.एम.अग्रवाल, के.एम. राजपूत, योगेश अग्रवाल, डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, डॉ. सुनील राजपूत, राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, प्रा. डॉ. मिलिंद बिल्दीकर, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी एन.सी.सी व एन.एस.एस चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. वसईकर यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मानले आहे.