जळगाव प्रतिनिधी । राज्यासह जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला असून लवकरच पहिला कल येण्याची शक्यता आहे. याचे आम्ही लाईव्ह कव्हरेज आपल्याला सादर करत आहोत.
राज्यातील २८८ तर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. या सर्व मतदारसंघांमध्ये आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.
प्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. यांची मतमोजणी सुरु झाल्यानंतर इव्हीएमची मतमोजणी सुरु होणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणालाही मोबाईल किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. केवळ आरओ व सुपरवायझर यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था पूर्ण केली आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेल्या फेर्या- चोपडा विधानसभा मतदार संघ २३ फेर्या, रावेर २२ फेर्या, भुसावळ २२ फेर्या, जळगाव शहर २९ फेर्या, जळगाव ग्रामीण २३ फेर्या, अमळनेर २३ फेर्या, एरंडोल २१ फेर्या, चाळीसगाव २४ फेर्या, पाचोरा २३ फेर्या, जामनेर २३ फेर्या, मुक्ताईनगर २३ फेर्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.
लाईव्ह ट्रेंडस् न्यूजवर महाकव्हरेज
लोकसभा निवडणुकीच्या निकालाप्रमाणे आज सकाळपासून लाईव्ह ट्रेंडस् न्यूजवर निकालाचे लाईव्ह कव्हरेज करण्यात येणार आहे. आमचे पोर्टल, फेसबुक पेज, युट्युब अकाऊंट आणि व्हाटसअॅप बुलेटीनच्या माध्यमातून युजर्सला याचे अपडेट देण्यात येणार आहेत. तर फेसबुक पेजवर सातत्याने १२ तासांचे लाईव्ह कव्हरेज देण्यात येणार आहे. यात प्रत्येक मतदारसंघातील अपडेटस् तसेच याचे विविध आयामांमधून विश्लेषण करण्यात येणार आहे. यात राजकीय, सामाजिक तसेच अन्य विविध क्षेत्रांमधील मान्यवर सहभागी होणार आहेत.