
जळगाव प्रतिनिधी। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान संथ गतीने सुरू होते. पाऊस थांबल्यानंतर मात्र, मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे सकाळी बहुतांशी ज्येष्ठ नागरिक व नोकरदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र तरुणांमध्ये सकाळच्या वेळी प्रतिसाद कमी दिसून येत होता. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान होत आहे. शहरात मतदान केंद्रावर अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी जिल्हा पोलीस दलातर्फे घेण्यात आली आहे. आज शहरातील परशुराम विठोबा पाटील या शाळेत विभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांनी पाहणी केली.