Home Cities धरणगाव धरणगावमध्ये शांततेत मतदान ; मतदान केंद्रांवर मोठी गर्दी !

धरणगावमध्ये शांततेत मतदान ; मतदान केंद्रांवर मोठी गर्दी !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. धरणगाव शहरातील प्रमुख मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दुपारचे २ वाजेपर्यंत अनेक केंद्रांवर नागरिक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी आल्याचे पहायला मिळाले.

मतदान प्रक्रियेदरम्यान, महाराष्ट्र जनविकास आघाडीसह निवडणुकीत उतरलेल्या इतर प्रमुख पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांच्या बाहेर उभे राहून मतदारांना आवाहन करताना दिसून आले. आपल्या मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

निवडणूक शांततेत पार पडावी आणि कुठलाही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धरणगाव पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या या कडक बंदोबस्तामुळे शहरातील मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. धरणगावच्या नागरिकांचे लक्ष आता या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.


Protected Content

Play sound