मुंबई, : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी ( ६ ऑक्टोबर) रोजी काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मंत्रालयातील परिषद सभागृहात, सहाव्या मजल्यावर पार पडणार आहे.

राज्यात एकूण २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायती असून, त्यांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मंत्रालयातील सुरक्षिततेच्या कारणास्तव व प्रवेश मर्यादित असल्यामुळे, प्रत्येक राजकीय पक्षाला केवळ दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी अशा दोन प्रतिनिधींची शिफारस करुन त्यांना सोडतीसाठी पाठवण्याची विनंती प्रशासनाने केली आहे.
सदर सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व प्रशासकीय नियमावलीनुसार पार पडणार असून, उपस्थित प्रतिनिधींना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन सोडतीपूर्वी दिले जाणार आहे. नगर विकास विभागाचे शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केले आहे.



